संवर्धित वास्तव Augmented Reality...(AR)

About Augmented Reality...संवर्धित वास्तवाबद्दल...


आपण 'पोकेमोन-गो' खेळ खेळला आहे का ?
किंवा फोटो क्लिक करताना स्नॅपचॅट लेन्सेस वापरल्या आहेत का ? ही काही  'ऑगमेंटेड रिॲलिटी' (AR) ची उदाहरणे आहेत.

स्मार्टफोनचा कॅमेरा वापरून बऱ्याचदा AR काही डिजिटल घटक दृश्य रुपात आपल्यासमोर मांडते.

इथे AR अनुभवतानाचे आमच्या विद्यार्थ्यांचे काही फोटो आहेत.

सध्या तंत्रज्ञानाचा हा सर्वांत मोठा ट्रेंड आहेआणि आपण असे म्हणू शकतो की येत्या काही वर्षांत, याचे प्रमाण अधिक वाढू शकते कारण हे AR रेडी स्मार्टफोन्स आणि इतर डिव्हायसेस सहज उपलब्ध होऊ लागले आहेत.  

आज संगणक आणि वर्ल्ड वाईड वेब एका क्लिक वर आपल्याला अतुलनीय माहिती उपलब्ध करून देत आहे. परंतु इनपुट फक्त कीबोर्ड आणि डेस्कटॉप पर्यंतच मर्यादित आहेत. पण दुसरीकडे स्मार्टफोन कॅमेरा, GPS आणि स्क्रीन्स वापरकर्त्याला रिअल-टाईम, स्थान-विशिष्ट माहिती देखील पुरवत आहेत. 

भविष्यात, परिधान करण्यायोग्य AR Displays मुळे एखादी माहिती आपण त्वरित आपल्या डोळ्यांसमोर पाहू शकणार आहोत. तसेच आपल्या संगणक व इंटरनेट वरील माहिती इतर कोणत्याही डिव्हाईस च्या मदतीशिवाय पाहू व वापरू शकणार आहोत. प्रक्षेपित प्रतिमांचा वापर करून अधिक दृश्य माहिती मिळवली जात आहे व त्यामुळे आपण पाहत असलेले वास्तव अधिक सुधारले आहे आणि संवर्धित झाले आहे. 


आज अनेक प्रकारचे सॉफ्टवेअर चेहऱ्याची संरचना लक्षात घेऊन समोर एखादी व्यक्ती असल्याचे ओळखु शकतात . परंतु फक्त व्यक्ती किंवा वस्तू ओळखणे इतकाच AR चा वापर नाही.. तर परिधान करण्यायोग्य चष्मा व कॉन्टॅक्ट लेन्सेस चा एकत्रित वापर करून AR तंत्रज्ञानाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. 
जसससे तंत्रज्ञान आकाराने कमी होत आहे तसतसे एखादे डिव्हाईस स्मार्टफोनची सगळी कामे करू लागले आहे. 
भविष्यात,
  • तुम्ही आकाशाकडे पाहाल आणि त्यादिवशीचे हवामान तुम्हाला समोर दिसेल. 
  • टेक्स्ट मेसेज व इनकमिंग कॉल चे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर दिसतील. 
  • जेंव्हा तुम्ही तुमच्या मित्राला विचाराल कि नवा टी-शर्ट कोठून घेतलास ?.. तेव्हा विविध ऑनलाईन स्टोअर मधील टी-शर्ट च्या किमती तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर दिसतील. 
  • इंटिग्रेटेड GPS सिस्टम तुम्हाला एखाद्या अनोळखी रस्त्यावरून चालताना नजरेसमोरच बाण किंवा विविध खुणा दाखवू शकेल.
जरी हे तंत्रज्ञान पुढील काही वर्षांत आपल्याला उपलब्ध होणार असले तरीही काही आव्हाने आहेत. 
पहिला मुद्दा येतो तो डिव्हाईस चार्ज करण्याचा. कारण कोणतेच डिव्हाईस पूर्ण दिवस चालणारी बॅटरी सामावण्याइतके मोठे नाही. 
दुसरा मुद्दा म्हणजे मानवाची दृष्टी-मर्यादा. कारण डोळ्याच्या एकदम जवळ असलेली वस्तू पाहणे मानवी दृष्टीला खूप कठीण असते. तसेच हा चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्सेस पूर्ण दिवस परिधान करणे योग्य ठरेल का हाही एक प्रश्न आहे. 
संशोधक, अनेक कंपन्या, विद्यापीठे विविध AR Displays वर काम करत आहेत आणि या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाय शोधात आहेत. 

तर असे आहे संवर्धित वास्तव .. अर्थात Augmented Reality !
Visit Our Website